जीवनसाथी कोण ??
प्रेमळ ज्याचा साथ हाती नेहमी हात अडखळता सावरतो मनातच बावरतो तोच जीवनसाथी असतो ... वेळ सरते जशी प्रीती वाढते तशी दुःखात सावरतो सुखात बावरतो तो जीवनसाथी असतो.. भाग्य लागते अश्या साथ लाभन्याला प्रसंगी आधार नकळत आपला तो बनतो तो जीवनसाथी असतो.. हास्यासाठी आपुल्या गीतकार, गायक बनतो चालता बोलता जो मन सजवून जातो तो जीवनसाथी असतो.. प्रत्येक क्षण त्याच्याविना जेव्हा अधुरा भासतो तेव्हा आनंद देखील मनातल्या मनात रुसतो तो जीवनसाथी असतो .. सुखाचा अर्थ कळतो हास्यात रंग खुलतो झुरताना ही एक अलगद मोहर फुलतो ... जेव्हा सोबत जीवनसाथी असतो ... - आरु