हेच बघायचं होत मला... गोड निखळ हसणाऱ्या डोळ्यातून अश्रुधारा हलके हलके उडणाऱ्या विचारांचा तो पसारा सोबत घेऊन जातो हास्याश्रु ते सारे दाखवतो कसे क्षणात बदलतात हे वारे रक्षणाचं वचन देऊन साथ मी सोडतो किती फरक पडला वरून मी बघतो क्षणात सर्वत्र फोटो येतील का माझे ? आठवणीत माझ्या डोळे भरतील का तुझे ? माझ्यात जपली होती थोडी-फार कला मेहनतीने गुंफले मी त्या सुगंधी फुला ... काय वाटत होते बोललो नाही जरी मीडियाने एका क्षणात रचली ना स्टोरी .. काय घडले , काय घडते हे लक्षात येत नाही मला पण असं वाटतंय हेच .. बघायचं होत मला .... -आरु