ऋण शमले..

क्षणात हसला क्षणात रडला
आज अचानक पाऊस पडला
तोच स्वप्नातला प्रसंग घडला
चकित होऊन तो धडपडला

एका क्षणात बदलले वारे
दुसऱ्या क्षणी नातलग सारे
सगळ्यांचे ते वेगवेगळे तोरे
असेच जीवन असते का रे ?

गुरफटता हो मने जुळली
हसता रडता साथ मिळाली
एकांताची भीती पळाली
या नात्याची मजा निराळी 

सुख घरात येऊन हसले
तुझ्यात मन रुतून बसले
या तळ्याकाठी ते रमले
जुने सारे ऋण हो शमले ।।

                               -आरु

Comments

  1. Speechless.... when words dont come, its a silence. Silence represents absence of words.... rainbow in the rain represent a brigde that connects dreams with reality.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....