आई....
आई....
शब्दांची गरज नाही तिला
भाव डोळ्यातले ओळखते ती
आवाजातला ओलावा कळतो तिला
आई... तुझी रोज आठवण येते मला ।।
मन भरकटते दाही दिशांना
जीव धडपडतो शोधताना माया
पापण्या मिटतानाही सलते ओढ
कुठेही मिळत नाही ती सुखद छाया
हे न सांगता ही कळते तिला ...
आई ... रोज आठवण येते मला
संकटात धीर सुटत नाही माझा
असतो एक किरण उमेदीचा साथी
अश्रूंच्या धारा अटतात डोळी माझ्या
हास्य उमलते हळूच माझ्या ओठी
शिकवणींवर विश्वास आहे ना हो तिला ...
आई... रोज आठवण येते मला
ना बोलता ही सल तिला उमगून जाते
लपवलेले सगळे कसे तिला कळून येते
कोणी नसले तरी ती असेल पाठी
हे जगात अनमोल असे एकमेव नाते
हे खरं तर सांगायची गरजच नाही तिला ...
न बोलता ही कळते तिला ... तिची रोज आठवण येते मला...
खुद को जला कर जो हमारी जिंदगी रोशन करें, दुनिया की सभी mom को Happy mother's Day.
ReplyDeleteWonderfully expressed. Keep it going.
धन्यवाद ! Thank you for your support !!
Deleteखुप छान .. ☺️💐
ReplyDeleteमनापासुन आभार !!
DeleteApratim... Khup chan
ReplyDeleteआभारी आहे !!
DeleteKhupch chan
ReplyDeleteआई कसा होऊ तुझा उतराई .
ReplyDeleteखर आहे ... एक जन्म पुरेसा नाही ...
Delete