अंकुर
काय घडले हसता खेळता
नभ कोसळले क्षणात सारे
मी तर आहे इथेच आजवर
जीवनाचे मात्र बदलले वारे
वाऱ्याच्या त्या वेगात आता
पाकळ्यांनी धीर सोडला
जरी एकवटल्या फांद्या तरी
माझा आज कणा मोडला
फळांनी आता धरली धरती
मातीमोल हो काया झाली
बोलता बोलता आज इथे
ओळख माझी अपुरी राहिली
अनेकदा ऐकले मी आहे
संपते तिथे सुरुवात नवी
बीज अंकुरत बोलत आहे
तुझ्या मायेची साथ हवी
-आरु
kya bat haii ....wahhh
ReplyDeleteKhupach sundar........
ReplyDeleteखूप सुंदर....
ReplyDeleteबऱ्याच दिवसांनी वाचलं असं काही...
There is never The End. Its The new begining after the end. World goes on and on... Time does not stops..Rather we learnt to change over the time...nothing is permanent.
ReplyDelete