परिवर्तन

बोलकं असण्याची माफी मागावी लागतेय 
स्वभाव बदलण्याची सवय करावी लागतेय

का प्रत्येकवेळी आपण माघार घ्यायची
गरज फक्त मलाच आहे का या नात्यांची

वाटत समजून घेणारा एक व्यक्ती आहे 
त्यापुढे बोलण्याचा त्याला त्रास होत आहे 

सगळं दाटलेलं आता साठवाव लागतेय
स्वभाव बदलण्याची सवय करावी लागतेय

मनात रडले तरी वरवर हसावं लागतेय
 त्याच्या सोबतीसाठी सर्व हे झाकतेय

त्यालातरी भावना कळतील आशा बाळगतयं
मनातल्यामनात सार काही फक्त धुसमुसतंय

एकांतात मोकळं व्हायला जागा शोधतंय
बंदिस्त खोलीत मात्र खूप गुदमरतंय 

मोकळीक फक्त विचारांची मिळतेय
येतील त्या क्षणात जगायला बघतेय

आता अबोल बनून जगायला शिकतेय
मूळचा स्वभाव बदलायला निघतेय 🥺

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....