विरह...
सुख समजायला जसं
दुःखाचा डोंगर हवा ।
प्रेम फुलायला तसाच
शून्यातील विरह हवा ।।
वाटतो तुझ्यासवे जसा
प्रत्येक क्षण नवा ।
प्रेम उमलायला तसाच
त्यात रमलेला वेळ हवा ।।
संथ पाण्याला जसा
खळखळणारा झरा हवा ।
प्रेमात डुंबताना तसाच
प्रीतीचा सागर हवा ।।
अथांग नभात जसा
चांदणीला चंद्र हवा।
नवजीवन बहरायला तसाच
तुझ्या प्रेमाचा संग हवा ।।
- आरु
Ani premat kalvalnarya eka premi la tumchya kavita havya .. 😍👌
ReplyDeleteSo true.... excellent words and expression of feelings
ReplyDeleteVirhane prem wadhte...he kiti chan sangitlay aaru...mastt..
ReplyDelete