देशील ना ?
देशील ना ?
दोन गोड शब्दांची
साथ मला देशील का ?
मी आहे रे फक्त तुझी
एक प्रेमळ हाक देशील का ?
फुलणाऱ्या कळीवर बेधुंदशी
एक फुंकर घालशील का ?
सुकलेल्या भूमीला थोडा
ओलावा देशील का ?
उडताना या पतंगाला
वाऱ्याची साथ देशील का ?
वसंतातला बहर तू
या जीवनी आणशील ना ?
बोल ना साथ मला
देशील ना ? देशील ना ?
-आरू
कवितेमधून प्रेयसीची आर्तता छान प्रकट झालीय.
ReplyDeleteWahh ...mastt...
ReplyDelete😍😍😍
ReplyDeleteKhup Chaan
ReplyDeleteSo soothing....
ReplyDeleteछान कविता
ReplyDelete