विश्वासाची नाती ..

विश्वासाच्या नात्याची 
या जगामध्ये माती 
आधारासाठी दिलेली
ती एक तुटकी काठी ..

विश्वासाने मागितले तर
जीवन अर्पित होतो
याच नात्यांसाठी रोज
जीव जाळीत होतो 

मुलीच्या कर्तव्यात 
ठेवली नव्हती त्रुटी
विश्वासाच्या नात्याची
या जगामध्ये माती

भावाच्या इच्छेसाठी
मन मारीत आलो
आईच्या इच्छेसाठी 
रोज रोज खंगलो

आनंदासाठी यांच्या
कोरी लेकीची पाटी
विश्वासाच्या नात्याची
या जगामध्ये माती

अनेक ठिकाणी रोज
दौप्रदी विनवत आहेत
कुठे हरवलाय कृष्णा 
तुलाच शोधत आहेत 
 
यांनीच आता उचलावी
हातामध्ये काठी
विश्वासाच्या नात्याची
या जगामध्ये माती ...

आधारासाठी दिलेली ती 
एक तुटकी काठी ..

-आरु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....