शेवटचे पान ..

शेवटचे पान ..

प्रत्येक व्यक्तिमत्वाचा
माहिती मला सूर छान
होय मीच आहे
वहीचे शेवटचे पान ..

टिंगल टवाळी 
अन सुरेख नक्षी
सगळ्यांचा हो
मीच आहे साक्षी 

प्रत्येकाचा आता
ओळखतो मी भांग
काय हवी माहिती 
पटकन सांग ..

मांडू शकतो मी
छबी व्यक्तींची
माहीत आहे मला
खोडी प्रत्येकाची

म्हणूनचं तर वेगळा
असतो माझा मान
होय मीच आहे
वहीचे शेवटचे पान ..

                  -आरु

Comments

  1. wahh aaru mastt lihilay...agdi shaleche diwas athvle.

    ReplyDelete
  2. अगदी मनातलं लिहिलं आहेस.. खूप आठवणी दाटून आल्या.. आता वाटतंय शाळेची एखादी वही मिळावी आणि मनभरून पाहून घ्यावं आपण काय बरं लिहिलं होतं त्यावेळी.. �� आता सुद्धा आहे शेवटचं पान पण आता मात्र त्या शेवटच्या पानावर असतात महत्वाचे contact details, passwords etc etc �� माणसाने मोठं होऊच नये.. पण तुझ्या या कवितेने शाळेत नेऊन सोडलं नक्की..

    ReplyDelete
  3. Colourful Dreams of life for future sketched with single coloured pencil or pen, some of which lived, some still unlived, Some realised some still unrealized. The last page always painted with the hope. Hope that future will be bright. You touch every subject so delicately.

    ReplyDelete
  4. Weird signatures, funny drawings, homework reminders....
    Were sweetest memories that the last page of our notebook gave us...😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....