शब्द बोलू लागले

पेन आला हाती 
शब्द उमटू लागले
भाव अंतरंगातले
आज बोलू जाहले ।

गदारोळ त्यांचा होता
बांध मी हो घातले
गर्दी नको विषयांची
तर भाव हे गोठले ।

व्यक्त होण्याची सारे
वाट शोधत होते
मुक्तीच्या आशेत आज
स्वच्छंद बागडत होते ।

सारे अगदी दाटलेले 
मत मांडत होते
फरक  नसेल जरी
कोणास , सांगत सारे होते ।

स्वच्छंद हवेत उडाले
भार हलके झाले
दखलपात्र नसले तरी
कागदावरती आले ।

कागदाचा मात्र भार
आज वाढला आहे
वाचून हलके करेल
आस ही त्यास आहे ।

भावनांचा भार हा 
त्यासही पेलवला नाही
भरकटला तो ही 
त्यांसवे दिशा दाही ।।


- आरु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....