आठवणी
वादळासारख्या आठवणी आल्या
मोत्यांच्या धारा घेऊन
टपोऱ्या डोळ्यातून बरसल्या
मुसळधार पाऊस होऊन
मुसळधार पावसातला
एक थेंब माझा असू दे
मनाच्या घरातला
एक कोपरा माझा असू दे
तुला यातून सावरताना
जाईन मी वाहून
जरी आठवणी आल्या
असा पाऊस घेऊन ...
स्वप्नातल्या सप्तरंगाचा
एक रंग माझा असू दे
हृदयातील रोपांचा
नवपर्ण माझा असु दे
नवजीवन बहरेल
सर्वस्व झोकून देईन
सांग फक्त मला ...
सांग फक्त मला ...
जर आठवणी आल्या वादळ होऊन...
- आरु
Nice
ReplyDeleteWahh ...kharach athvan ali..
ReplyDeleteThere is always a relation between tears and true love. Very truely conveyed is it rain that will physically drown me or tears from your memory that would wipe out my soul?
ReplyDeleteMastach👌
ReplyDeleteखूप छान 👍
ReplyDelete