चांदणे ..

चांदणे ...

हलक्या हलक्या चांदण्यात
तुझे हास्य दिसले
लाजताना मी मनात
प्रेमात आज पडले

पडता पडता सागरात
तूच तोल सावरला
हाती हात घेता तू
जीव माझा बावरला

बुडता बुडता विचारात
टिपूर चांदणे झाले
या बहरणाऱ्या नात्यात 
मी संपूर्ण न्हाले 

रमताना या तरण्यात 
मग मला उमगले
सखे गं.. आहेस स्वप्नात
मग हळुवार डोळे उघडले ...

Comments

  1. Even if thats a dream, wish such dream never interrupts. Beautiful expressions wish one can live such in real.

    ReplyDelete
  2. wahh kasli bhariye kavita superb...

    ReplyDelete
  3. सुंदर कविता...

    ReplyDelete
  4. Khup sundar....avdli kavita🤗

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....