करार..
करार ...
आयुष्याचा करार
मांडला हा बाजार
साथ तुज असेल
नसेल माझी माघार ..
रखरखत्या उन्हात
फुललेला गुलमोहर
सुकलेल्या डोळ्यांना
जशी सुखाची चादर..
सुखावल्या अंगणात
वेली झालेल्या बेकार
आता पर्याय शोधत
स्वप्न होईल साकार
बघ नवीन प्रहरी
सजेल नवा आकार
आशेचा किरण असेल
नको देऊस नकार ।।
- आरु
👌👌👌
ReplyDeletemasttt
ReplyDeleteWith positive vibes in your poem, there goes a promise to hold the hand of loved one forever through out the life come what may.
ReplyDelete