रिमझिम रिमझिम धारा ..
रिमझिम रिमझिम धारा
धुंद-बेधुंद वारा
मनास मोहवणारा
निसर्गाचा खेळ सारा
चाहूल लागता मनाला
मन ओलेचिंब होते
सप्तरंगात न्हाहुन
थेंबांच्या तालावर थिरकते
हा ऋतूच आहे वेड लावणारा
या रिमझिम रिमझिम धारा ..
अतुल्य या निसर्गात
मन अतृप्त राहते
पण अत्यल्प वेळात
नाते अतूट जुळते
पानांशी खेळणारा अंधाधुंद वारा
अन या रिमझिम रिमझिम धारा ..
हे थेंब पावसाचे
रिमझिम झरणारे
भाव मांडण्यास
सारे शब्दही अपुरे
भरकटता आला अंगावरी शहारा
या रिमझिम रिमझिम धारा
अन बंधुंद असा वारा ... ।।
wahh sakshat paus atahvla...mastt
ReplyDeleteधन्यवाद !!
DeleteFelt like got wet in rains...awesome
ReplyDeleteThanks for sharing your feelings !!
DeletePratyaksha dolyasamor chitra ubhe rahile pavsache...😍😍
ReplyDeleteख़ुप खुप आभार !
Deleteखूपच सुंदर कविता 👌
ReplyDeleteधन्यवाद !!
Delete😍😍👌👌
ReplyDelete