आज नव्याने.....

आज नव्याने.....
स्वच्छंदी मनाने , खेळ मांडला
पत्त्यांचा बंगला हलकेच कोसळला.

उभारलेले नवे , घर आपुलकीचे हवे
मनोमने जुळलेली , हास्यात भिजलेली...
पण आज नव्याने ...
गर्वाच्या भुताने खेळ मांडला
पत्त्यांचा बंगला हलकेच कोसळला ...

वाटले की कोणी ..
वाटले की कोणी दुखावले नाही ..
पैश्याचा पसारा कधी सर्व घेऊन गेला ...

अरे कळलेच नाही.. कधी खेळ हा संपला..
पत्त्यांचा बंगला हलकेच कोसळला ..


धीर धरत मनाने ,,
ठरवले नव्याने ..
प्रेम आणि जिव्हाळ्याच्या भिंती उभारून नव्या ..
पुन्हा जमतील सारे , आवाज दुमदुमेल हसलेला..

पुन्हा बांधेल बंगला तो हलकेच कोसळलेला....

पुन्हा नव्याने उभारला ... !

-आरु ❤

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....