तुझ्यामुळे ..
तुझ्यामुळे ...
क्षण माझे हसले,
मन माझे रमले रे
हसता हसता डोळ्यांनी
मोती टिपले तुझ्यामुळे ...
कळी उमलताना
रंग बहरलेले रे
बोलता बोलता श्वासांना
सुगंध मिळाला तुझ्यामुळे ...
पंख मिळताना
जग बदलेले रे
उडता उडता पाखराने
जग जिंकले तुझ्यामुळे ...
- आरु
Heart overflowing reading this one and my eyes are the witness.
ReplyDeletethanks for sharing your view .. love is incredible.. isn't it ?
ReplyDelete