झेप..
झेप..
बोलता बोलता हसता गाता
नियतीने चांगलाच खेळ मांडला
स्वप्नांसह माझ्या मनाचा
कडेलोट का केला गेला ?
नको नकोसे जीवन होता
जगण्याचा अट्टहास धरला
"जगावेच लागेल तुला!"
अन अपेक्षांचा मारा केला
ओझे सांभाळता त्यांचे आता
वाटा साऱ्या बदलत गेल्या
तो मी अन मी आताचा
प्रतिमा साऱ्या धूसर झाल्या
बदल खेळ नियतीचा असता
मत परिवर्तन होत होते
स्वतःचे कधीही न ऐकता
जीवन मात्र अनोळखी होते
मजसाठी जगण्याचा मी
नवा आज अट्टहास धरला
माझे मी आकाश शोधता
पंखात नवा त्राण भरला
पहिली वहिली झेप घेतली
स्पष्ट झाले आयुष्य मला
एक नभी ज्योत पेटली
स्वत्व गवसले आज मला
-आरु
wahhh...
ReplyDeleteHow many can express their feelings as u do? Lovely to read you and how can i express how the feelings are.....
ReplyDelete