द्विधा ...
गरज असते का
मनात नसतानाही हसण्याची
पटत नसतानाही होकाराची
उत्तर नसतानाही ते देण्याची
गरज असते का
बोलत नसतानाही बोलण्याची
अश्रूंना डोळ्यात आटवायची
जागा नसतानाही साठवायची
गरज असते का
हवे असतानाही नाकारायची
बळ असतानाही खंगायची
पंख नसतानाही उडायची
गरज असतेही अन नसतेही
मन तर कधी मान जपताना
नको असले तरी नाती जपताना
रोज स्वतःला धीर देताना
-आरु
Nice lines..
ReplyDeleteChhan
ReplyDeletewahh ...garaj astehi garaj nastehi..wahh wahh
ReplyDeleteSuperb..
ReplyDeleteThis Never ending fight goes on and on ...... till life exists
ReplyDelete