ओल ..
नाते रुतते जेव्हा खोल
तेव्हा त्याची कळते ओल
नसतो हाती हात जेव्हा
जाणीव कळते त्याची तेव्हा
सोबत असता नाही म्हणते
नसताना तर ओढ सलते
प्रेमरंगात मन हे माखले
सारे रस ते हळूच चाखले
कडू गोड अन तिखट नाते
रडता हसता वाहून जाते
जीवन नगरी नात्याचे मोल
कधी जिव्हारी लागते बोल
नाते रुतते जेव्हा खोल
तेव्हा त्याची कळते ओल
-आरु
Superb
ReplyDeleteSahi
ReplyDeleteReally...
ReplyDeleteYour words are so fluent they express in so lucid language the feelings of many who cant express those. Wonderful.
ReplyDelete