प्रीत तुझ्याच मनातली

कळे जे मला .. ते कळेना का तुला ..
प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !!
भाव बनले शब्द जे
प्रीत तुझी तरी शब्द हे ...
आठव तुझी सख्या ती
सांजवेळी छळे मला .....
प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !!
अव्यक्त तूझी प्रीत ही
जगण्याची झाली रीत जी
नयनांचे संवाद जेव्हा
स्पष्टती सगळे मजला ...
प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !!
कळे जे मला .. ते कळेना का तुला ..
प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !!

- आरु .. 😊

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....