कथा
कथा
कुठे जाऊ कुठे जाऊ
कुठे जाऊ कुणा सांगू मी ।।
रस्त्यावर काटे आहेत
डोळ्यांमध्ये पाणी आहे
सूर्याची किरणेही आज
दूर कुठे हरवलेली आहेत ।।१।।
आज एकही फुल
का उमलत नाही?
आज मनातही कोणी
का हसत हो नाही ।।२।।
निसर्ग चित्रही आज
बेरंगी भासत आहेत
पहिल्या पावसाचा
गंधही हरवला आहे ।।३।।
मन माझे नात्यांच्या
तव्यावर भाजत आहे
त्यावर सासूचे बोलणे
अजून चटके देत आहेत ।।४।।
जीवनामध्ये नाही मिळाली
आजवर साथ कोणाची
कोणालाही हे व्यक्त
करण्यात काही अर्थ नाही ।।५।।
रस्ता पुढचा मिळत नाही
आता सांगा कुठे जाऊ मी .....
रक्ताची नाती तोडून
दुसऱ्याबरोबर जगणे आहे
स्वतःच्या मुलांसाठी वेळ
काढणे कठीण आहे ।।६।।
सासू सासऱ्यांची सेवा करा
त्यात नवऱ्यासाठी मरा
स्वतःसाठी वेळ काढणे
स्वप्नातही शक्य नाही मला।।७।।
दिवस प्रत्येक सारखा आहे
काट्यांनीच भरलेला आहे
किती दिवस रक्ताळलेल्या
पायांना लपवणार मी ।।८।।
किती दिवस पायातले काटे
रोज रोज काढणार मी ?
कुठे जाऊ कुठे जाऊ
कुणा हे सर्व सांगू मी .......
माझी कथा माझी व्यथा .... ।।९।।
-आरु💞
Comments
Post a Comment