का असे वाटते ...
का असे वाटते ...
आज का असे वाटते
एकटेच बसून राहावे
जगाला विसरून जावे
का असे वाटते फक्त
एकांतच असावा
सगळे अबोल असावे
का असे वाटते की,
मी अन् मीच असावे
सर्व काही विसरून जावे
कोणीच काही न बोलावे
आज का असे वाटते
डोळे घट्ट मिटून पडावे
कुठेतरी हरवून जावे
आज का असे वाटते
मनात मनाला वाचावे
विचार सगळे संपवावे
थंड हवा,नवा गारवा
सांगत आहेत मला
जीवन कसे जगावे
फक्त तू आणि तूच
असण्यात अर्थ नाही
इतरांबरोबर जगूनही बघावे
का असे वाटते एकटे
क्षणात विसरून जावे ....।
-आरु💞
Comments
Post a Comment