प्रतिक्षा...

कळत होते नभास त्या
लपली सूर्यकिरणे आता
दाटलेला कंठ नभाचा
विनवतोय त्यालाच आता

बास झाली परीक्षा हि
संपलाय धीर आता
एक नभ विनवी दुसऱ्यास
चल ना रे बरसुया आता

कंटाळा मज आलाय
भार झालाय जन्मांचा
जल शिंपडून जन्म देऊ
अन् संपवू भार जन्माचा

दाटलेला कंठ विनवतोय
दाटलेल्या कंठाला आता
पाण्यासाठी तरसतोय एक
एक व्यक्त होण्यासाठी आता

संपली प्रतिक्षा आता ही
घन निळा बरसला
धरणी हि सुखावली
सुगंधी संसार पुन्हा थाटला

वेळ वेळीचे मूल्य सारे
वेळ वेळीनेच भागले
योग्य वेळेवर वाटेत
मन अतृप्त शांत झाले  ।।

-आरु💞

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....