गुरू
गुरू वंदण्यासाठी
गुरू पौर्णिमा च का हवी ?
आपल्यात झळकते रोज
त्यांचीच छबी एक नवी.
रोज कोटी कोटी वंदन
त्यांस वाट योग्य दावली
गुपित सांगून जगण्याचे
साथ देते ती माऊली
मग गुरुस अश्या वंदण्यास
का एक दिवस हवा
ज्याच्या छायेखाली मिळाला
भर दुपारी चांदवा ..
- आरु
अगदी समर्पक कविता 🙏👍
ReplyDeleteTruely said.
ReplyDeleteगुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
Everyday and each day should begin with this prayer.