बाबा
बाबा
कविता करतात आईवर
का नाहीत त्या बाबांवर
त्यांच्याच तर शिकवणींचा
ठसा उमटतो जीवनावर
क्षितिजाप्रमाणे त्यांच्या
प्रेमाला अंत नसतो
बाबा आणि आईत मग
फरक काय असतो ?
आई प्रेम अन माया देते
तर बाबाही धीर देतात
धडपडत असलो तरीही
चालायला ते शिकवतात
कधी कधी मात्र ते
फार फार रागावतात
पण नंतर त्यांचेच
डोळे का हो पाणावतात
आई इतका वेळ जरी ते
आपल्याजवळ नसतात
तरीहि त्यांचे ते क्षण
आपल्यासाठीच तर असतात
खडकाखाली जसा गोड
पाण्याचा झरा गवसतो
मनामध्ये त्यांच्या तोच
गोडवा पाझरत असतो
बाबा सांगतात बाळगायला
स्वतःजवळ आत्मविश्वास
खचून जाऊ नको कधी
तरचं टिकशील आजच्या जगात
यशात नेहमी आपल्या
आईबाबांची साथ असते
भासत नसले तरीही
बाबांचे प्रेम अफाट असते
आपण मेलो तरीही या
आठवणी मरणार नाहीत....
आपण मेलो तरीही या
आठवणी मरणार नाहीत
एक फुल सुकले म्हणून
कळ्यांचे उमलने थांबणार नाही
अपयश आले तरी मी
आस यशाची सोडणार नाही
भरकटलेल्या समाजात
मी हरवणार नाही
बाबा आपल्या आठवणींना
मी कधीही गमावणार नाही
शिकवणींमुळे बाबा या
कधी तुम्हाला विसरणार नाही
कधी विसरणेही शक्य नाही ।।।
-आरु😍
Good..
ReplyDeleteआरु खरंय बाबांवर कोणी कविता करत नाहीत पण ही कविता खूप आवडली मनाला भावली..👌👌
ReplyDeleteआरु खरंय बाबांवर कोणी कविता करत नाहीत पण ही कविता खूप आवडली मनाला भावली..👌👌
ReplyDeleteबाबांनवर खुप छान कविता 💞
ReplyDeleteNice
ReplyDeleteHow much one tries but he/she can never update himself/ herself to a better version than his/her father. Memories with father are so special as he is the one who guided you to walk along path of life. Never can be forgotten. Very nicely written.
ReplyDelete