मुलगी
मुलगी
गोड आवाजात बोलणारी
पाणीदार डोळ्यांतून बघणारी
मायेच्या रंगात रंगलेली
सर्वांना समजून घेणारी ..... मुलगी
विचार न करता मदत करणारी
मायावी जगाला विसरणारी
मनातून निष्पात असणारी
जग स्वतःचे विसरून
इतरांचे जग बनवणारी ..... मुलगी
लोकांना का नको असते ती
नदीप्रमाणे जीवन देणारी ... मुलगी
रोपण्यागोदरच का
उपटतात हे रोपटे?
फुलण्यागोदरच का
खुडतात या कळ्या?
जर जीवन मिळते यांच्याचमुळे
तर निष्पाप जीवाला मारतात का?
पतंग उडवण्यागोदरच
दोर त्याची कापतात का?
रंगवण्याअगोदरच चित्र
जीवनाचे फाडतात का?
आईच्या डोळ्यातील आशेच्या
किरणांना अडवतात का?
आरक्षण असूनही या
भीतित खंगतात का?
मुलगी आहे म्हणून
हिला छळतात का ?
सुकलेल्या फुलाप्रमाणे
चुरगळतात का ?
अंधारातही दारामागे या
हळूच लपतात का ?
जखमांवर मलम मायेचे
लावणाऱ्यांवर मीठ चोळतात का?
तुमच्याकडून या प्रश्नाचे
उत्तर मला मिळेल का?
दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या
या मुलींना जगु द्या
आकाशातील स्वच्छंद
पक्षी यांना पाहू द्या
पाण्यातील माश्याप्रमाणे
मनसोक्त पोहू द्या
सुगंधाप्रमाणे या समाजात
त्यांना दरवळू द्या
हा मुलगा हि मुलगी
फरक कधीही करू नका
सुंदरस्वप्न सुरु होण्याअगोदर
स्वप्नभंग करू नका
जाता जाता मला
फक्त एक वचन द्या
कळीला फुल बनून फुलू द्या
अंधारात प्रकाशाचा
दिवा पेटू द्या
मुलीला मुलगी म्हणून
सन्मानाने जगू द्या ....
-आरु😍
👌👍👌👍
ReplyDeleteHeart touching.....
ReplyDeleteसमर्पक कविता 🙏
ReplyDelete