Posts

Showing posts from August, 2020

स्वाभिमान आणि गर्व

तुमचा तो स्वाभिमान  माझा तो गर्व ... नेहमी मोठे समजून माघार घेऊन , मान सन्मान देऊन पहिली माघार घेतली गेली असेल ती फक्त संस्कारामुळे..  पण आता माझं ही मन आहे, स्वत्व आहे , स्वाभिमान आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आणलीय तुम्हीच .. आपलं घर समजून हे करावं ते करावं . का ? आपलं घर समजून का ? लग्न करून आले म्हणजे हे घर माझं पण झालं ना . समजू का ? कोणत्याही निर्णयात सहभागी कधी केलय मला ..फक्त जर या चार भिंतीत प्रवेश दिलाय .. घरात नाही हे कसं कळणार बाहेरच्या लोकांना.  जिथे सगळ्यांची मनं एकमेकांसोबत घट्ट जुळलेली असतात ना ते घर असत अगदी पक्कं..  आधुनिक(मॉडर्न) तर बनायचय पण फक्त दाखवायला .. दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे हे मनापासून पटतंय आणि बघितलंय पण समोर .  इतर नात्यांच तर समजू शकते पण नवरा, मुलगा यांच्याशी दिवस दिवस अबोला कसा धरू शकत कोणी ... नवरा एक दिवस रागावला बोलणार नाही म्हणाला तरी शहारा उठतो अंगावर.. आणि कोणी कितीही मॉडर्न असो पण हा विचार कोणीही करू शकत नाही..  असो .. प्रत्येक अनुभवलेली किंवा कोणाचे अनुभवाचे बोल हे पूर्णपणे शब्दांत रूपांतरित होऊ शकत नाहीत ह...

पैसा

पैसा बोलायचा आता वागायला ही लागलाय रक्ताची नाती सुद्धा तो तोडायला ही लागलाय पैसा बोलायचा आता वागायला ही लागलाय ... सुख अनुभवताना गर्वात वाहवायला लागलाय गरिबीत किंमत शिकवत टिकायला ही लागलाय पैसा बोलायचा फक्त आता वागायला ही लागलाय .. दुरावलेले जवळ येतात जवळचे दूर जातात किंमत करून माणसे  विसरायला ही लागलाय  पैसा फक्त बोलायचा आता वागायला ही लागलाय ... प्रेमाची तुलना आता  पैश्यात केली जाते पैश्यात मान अपमान तोलला जाऊ लागलाय ... फक्त बोलायचा तो आधी आता वागायला ही शिकलाय ... एकमेकांच्या साथीने पैसा कमावताही येतो साथ देत तो हातात टिकवताही येतो  सोबतीची किमया  माणूस विसरलाय पैसा फक्त बोलत होता आता वागायला ही लागलाय  - आरु

आभास आनंद

मावळतो क्षणात  येऊन जीवनात  आभास आनंद दरवळत सुगंध ... हातात रेशमी नाजूक धागा जपण्याचा छंद आभास आनंद .. छळतो गारवारा पावसाच्या धारा मन धुंदबेधुंद हा आभास आनंद.. नात्याची काच पैश्याची ठेच मनमृग हे मंद आभास आनंद ... आला क्षणात  गेला क्षणात  मतलबी जगात एकाच सुरात .. उरलेली खंत  आभास आनंद .....

नात्याचा मोती

थोडी खास होतीस तू भेट वर भेटी वाढत गेल्या हातात हात घेत तू शिंपली वाहवत नेल्या ... मनातला मोती दुरावत तू कुठे नाहीशी झालीस ग अजूनही मनातल्या घरात खास जागा तुझीच ग .. विराहात नाते उलगडते त्यानंतर सुख सापडते  तुझ्या सोबत सखे ग मन आनंदात बागडते ... किनाऱ्यावर पुन्हा एकदा सापडला मोती प्रेमाचा  .. जोडला गेलाय आपल्यात का तो धागा रेशमी बंधाचा ? - आरु