स्वाभिमान आणि गर्व
तुमचा तो स्वाभिमान
माझा तो गर्व ...
नेहमी मोठे समजून माघार घेऊन , मान सन्मान देऊन पहिली माघार घेतली गेली असेल ती फक्त संस्कारामुळे.. पण आता माझं ही मन आहे, स्वत्व आहे , स्वाभिमान आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आणलीय तुम्हीच ..
आपलं घर समजून हे करावं ते करावं . का ? आपलं घर समजून का ? लग्न करून आले म्हणजे हे घर माझं पण झालं ना . समजू का ? कोणत्याही निर्णयात सहभागी कधी केलय मला ..फक्त जर या चार भिंतीत प्रवेश दिलाय .. घरात नाही हे कसं कळणार बाहेरच्या लोकांना.
जिथे सगळ्यांची मनं एकमेकांसोबत घट्ट जुळलेली असतात ना ते घर असत अगदी पक्कं..
आधुनिक(मॉडर्न) तर बनायचय पण फक्त दाखवायला .. दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे हे मनापासून पटतंय आणि बघितलंय पण समोर .
इतर नात्यांच तर समजू शकते पण नवरा, मुलगा यांच्याशी दिवस दिवस अबोला कसा धरू शकत कोणी ...
नवरा एक दिवस रागावला बोलणार नाही म्हणाला तरी शहारा उठतो अंगावर.. आणि कोणी कितीही मॉडर्न असो पण हा विचार कोणीही करू शकत नाही..
असो .. प्रत्येक अनुभवलेली किंवा कोणाचे अनुभवाचे बोल हे पूर्णपणे शब्दांत रूपांतरित होऊ शकत नाहीत हेच खरं..
-आरु
Comments
Post a Comment