पैसा
पैसा बोलायचा आता
वागायला ही लागलाय
रक्ताची नाती सुद्धा तो
तोडायला ही लागलाय
पैसा बोलायचा आता
वागायला ही लागलाय ...
सुख अनुभवताना गर्वात
वाहवायला लागलाय
गरिबीत किंमत शिकवत
टिकायला ही लागलाय
पैसा बोलायचा फक्त
आता वागायला ही लागलाय ..
दुरावलेले जवळ येतात
जवळचे दूर जातात
किंमत करून माणसे
विसरायला ही लागलाय
पैसा फक्त बोलायचा
आता वागायला ही लागलाय ...
प्रेमाची तुलना आता
पैश्यात केली जाते
पैश्यात मान अपमान
तोलला जाऊ लागलाय ...
फक्त बोलायचा तो आधी
आता वागायला ही शिकलाय ...
एकमेकांच्या साथीने
पैसा कमावताही येतो
साथ देत तो हातात
टिकवताही येतो
सोबतीची किमया
माणूस विसरलाय
पैसा फक्त बोलत होता
आता वागायला ही लागलाय
- आरु
Comments
Post a Comment