नात्याचा मोती
थोडी खास होतीस तू
भेट वर भेटी वाढत गेल्या
हातात हात घेत तू
शिंपली वाहवत नेल्या ...
मनातला मोती दुरावत तू
कुठे नाहीशी झालीस ग
अजूनही मनातल्या घरात
खास जागा तुझीच ग ..
विराहात नाते उलगडते
त्यानंतर सुख सापडते
तुझ्या सोबत सखे ग
मन आनंदात बागडते ...
किनाऱ्यावर पुन्हा एकदा
सापडला मोती प्रेमाचा ..
जोडला गेलाय आपल्यात का
तो धागा रेशमी बंधाचा ?
- आरु
Comments
Post a Comment