आभास आनंद
मावळतो क्षणात
येऊन जीवनात
आभास आनंद
दरवळत सुगंध ...
हातात रेशमी
नाजूक धागा
जपण्याचा छंद
आभास आनंद ..
छळतो गारवारा
पावसाच्या धारा
मन धुंदबेधुंद
हा आभास आनंद..
नात्याची काच
पैश्याची ठेच
मनमृग हे मंद
आभास आनंद ...
आला क्षणात
गेला क्षणात
मतलबी जगात
एकाच सुरात ..
उरलेली खंत
आभास आनंद .....
Comments
Post a Comment