आठव

आठव आसवांची की
तुझ्या चारोळ्यांची,
मनात फक्त भरली रे
प्रीती तुझ्या शब्दांची ।।

आठवणी जाग्या झाल्या
उरात जागर पेटला,
ठिणग्या आता टाकल्या
तरी मांडव थाटला ।।

साथ नाही तर नाही रे
प्रीती परी मनी उरली रे,
आठव आणि आसवं
यांची सांगड अनोखी रे ।।

सोबत यांनी येऊ नये
एकत्र यांनी जाऊ नये,
आस भावनेचा खेळ
आता तरी खेळू नये ..... ।।।

- आरू💞

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रतिक्षा...

शब्द वेडे