शोध
शोधू नको चालत जा
वाट तुला सापडेल,
पाट शोधू नको आता
अश्रूंची नदी थांबेल।
जीवनाला व्यापून घे
तुझी जागा तुला मिळेल,
एक धागा नात्याचा बांध,
रेशमी बंध तुला साधेल।
श्वासातलं मोकळं कर
मनातलं सगळं सुटेल,
उर्मिने जग फक्त
ध्यास तुला शोधेल ।
खरं खोट सोडून वास्तव्यात जग
तुझा तूच तुला सापडेल,
स्पनात आणि स्पंदनात
जीवनाचा अर्थ तुला गवसेल ।।
- आरू💞
Comments
Post a Comment