रिमझिम रिमझिम धारा धुंद-बेधुंद वारा मनास मोहवणारा निसर्गाचा खेळ सारा चाहूल लागता मनाला मन ओलेचिंब होते सप्तरंगात न्हाहुन थेंबांच्या तालावर थिरकते हा ऋतूच आहे वेड लावणारा या रिमझिम रिमझिम धारा .. अतुल्य या निसर्गात मन अतृप्त राहते पण अत्यल्प वेळात नाते अतूट जुळते पानांशी खेळणारा अंधाधुंद वारा अन या रिमझिम रिमझिम धारा .. हे थेंब पावसाचे रिमझिम झरणारे भाव मांडण्यास सारे शब्दही अपुरे भरकटता आला अंगावरी शहारा या रिमझिम रिमझिम धारा अन बंधुंद असा वारा ... ।।
आई.... शब्दांची गरज नाही तिला भाव डोळ्यातले ओळखते ती आवाजातला ओलावा कळतो तिला आई... तुझी रोज आठवण येते मला ।। मन भरकटते दाही दिशांना जीव धडपडतो शोधताना माया पापण्या मिटतानाही सलते ओढ कुठेही मिळत नाही ती सुखद छाया हे न सांगता ही कळते तिला ... आई ... रोज आठवण येते मला संकटात धीर सुटत नाही माझा असतो एक किरण उमेदीचा साथी अश्रूंच्या धारा अटतात डोळी माझ्या हास्य उमलते हळूच माझ्या ओठी शिकवणींवर विश्वास आहे ना हो तिला ... आई... रोज आठवण येते मला ना बोलता ही सल तिला उमगून जाते लपवलेले सगळे कसे तिला कळून येते कोणी नसले तरी ती असेल पाठी हे जगात अनमोल असे एकमेव नाते हे खरं तर सांगायची गरजच नाही तिला ... न बोलता ही कळते तिला ... तिची रोज आठवण येते मला...
Comments
Post a Comment