शब्द वेडे

शब्द वेडे , मन माझे ,
अक्षरांत गुंतलेले ।
मन खुळे, ध्यान माझे ,
क्षणाक्षणांत हरलेले ।

सुख मिळे, तन माझे,
मनमुराद हसलेले ।
वेळ खुळी, भय माझे,
समोर पुन्हा थाटलेले ।

विसर अश्रू,म्हणता माझे,
हास्यात बुडलेले ।
भाग्य मुळी, रुसले माझे,
मन प्रीतीलाही मुकलेले ।।।

- आरू💕

Comments

  1. Your words takes me back to my life to those days which are never gonna come back again. Still I like to read your poems, make me feel close to my life.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....