जीवनसाथी .. फक्त तुझ्याचसाठी
होतो अनोळखी एकमेकांसाठी
बंधात बांधलो होऊन जीवनसाथी
असेल सुखदुःखात तुला सदैव साथ
प्रत्येक क्षणात घेऊन हातात हात
मनातलं मनात ठेवतोस का रे साठून
रोखतोस कसा आलेला कंठ दाटून
बोलत नसलास तरी व्यक्त डोळे करतात
हळव्या मनाची गोष्ट एका नजरेत बोलतात
नको रे लपवू तुझ्या डोळ्यातलं पाणी
आता मी आहे ना तुझी अर्धांगिनी .......
मन मोकळं करत जा मला मित्र मानून
विश्वासाने सांगून तर बघ घेईल रे मी समजून
तुझं सत्य विष असेल तरी करेल प्राशन
दुसरीकडून कळलं तर स्वतःला देईल दूषण
मीच तुला माझा नाही बनवु शकले
विश्वासार्ह तुझ्या कशी नाही बनले
मला तुझ्यात तू म्हणून सामावून घे
माझे रागाचे लटके समजून घे
प्रेम आहे म्हणून कधी कधी बडबडते
रुसलास कि मग तुझ्या मागेमागे दुडदुडते
तुझी आधी मैत्रीण नंतर प्रेयसी यापलीकडे बायको आहे
तुही आधी मित्र बन माझा बघ नंतर
तुझी मैत्रीण किती सायको आहे😝
मनात ध्यानात श्वासात तू राया आहेस
सखा सोबतीहि माय बाप बंधू तूच आहेस
मैलो लांब आले घरदार सोडून तर बघ किती विश्वास माझा
तुटत रे मन जेव्हा म्हणतोस तू एवढाच विश्वास का तुझा
तू फक्त बोलून बघ जीव टाकेल ओवाळून
चुका फक्त बोलून टाक स्वतः सगळ्या घेईल गिळून
तुझी होते तुझीच आहे तुझीच असेल
तुझी अर्धांगिनी
- अन्विता😍💞(आरु)
Comments
Post a Comment