निशब्द
येतात आणि जातात ... राहतात फक्त आठवणी ,मग ती माणसं असो वा आयुष्यातील क्षण .
कधी मने जुळतात तरी कधी जळतात ... पण असतात सगळ्या साठवणी, मग ती रक्ताची असो वा माणुसकीची नाती .
नवीन सुरुवात शक्य आहे का विसरून सगळया मनातल्या गाठी ...
वेळोवेळी मन वेळ काढण्यासाठी झुरतंय ...
आभाळ नाही मोकळं तरी उडण्यासाठी धडपडतंय...
दाटलाय कंठ माझा , गोठलेले शब्द सारे ....
विश्वास तुटला आता बेभरोशी सर्व वारे .....
ना आशा करायची ना स्वप्न रंगवायचे ...
ना अपेक्षा करून स्वतःला भंगवायचे ...
तुटता काळीज सुटता धीर मनाचा
मनात अश्रू बरसवायचे ...
पण नवीन वर्षात हे सर्व बदलेल हि आशा नाही
जीवन असेच राहिले तरी आता काही निराशा नाही
निशब्द हा उपाय आहे
हाचि एक पर्याय आहे ....
शब्दाच्या दुनियेत आता
निष्ठुर बनायचे
निशब्द राहून आता , मनात मनास मारून आता...
मतभेद सगळे टाळायचे ...
निशब्द बनूनी राहायचे ....
-आरु💞
Comments
Post a Comment