नातं आपलं...
असचं आहे आपलं नातं, थोडं खट्याळ कधी थोडं भाविक , कधी चिडखोर तर कधी सात्विक ..... नसलास कि प्रचंड उणीव भासते(लव्ह यु) , असलास कि बडबडत असते😝(सॉरी). बघ ना किती पटकन दिवस सरले, अनोळखी असताना कोणी ओळख न करून देता विचित्र ओढ लागून ओळख झाली आणि वाढली ..... एकमेकांना प्रत्यक्ष्यात न बघता हि प्रेमवेल बहरली.. पहिली भेट , आठवतेय ? फक्त दहा मिनिटांची , एकमेकांच्या समोर असूनही शब्दांनी नाही बोललो पण डोळे मात्र प्रचंड काही बोलून गेले, सुखावले... पाचशे ते सहाशे किमी. दूर राहत आपण पण एकमेकांतले अंतर तिळमात्र नव्हते .
हळूहळू दोन तीन भेटी झाल्या , घरी सांगितलं , साखरपुडा झाला आणि आता आज लग्नाला बरोबर सहा महिने पूर्ण झालेत आपल्या.. मनात प्रचंड काहूर माजलेल होत , एवढ्या लांब जातेय संसार थाटायला तर अनेक प्रश्न होते कारण यासाठी अनेकांचे मत मी डावलून दिले होते. पण बघ ना मी तुझ्यासोबत अत्यंत सुखी आहे. हा मला कधी कधी होतो त्रास कारण कधी मी हट्ट केलेला नाही ,ना कधी मत माझं व्यक्त केलय. लग्नाआधीही आणि लग्नानंतरही म्हणून कधी दाटून आलेला कंठ त्यावेळी साठून ठेवून तुझ्या कुशीत येऊन त्याला वाचा फुटते. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत खुश नाही . आधी कधी मत कोणाजवळ व्यक्त न केल्याने जेव्हा तुझ्याजवळ बोलते तेव्हा शब्द ,वाक्य यांचा गैरअर्थ निघतो आणि तुला वाईट वाटते. मनापासून सांगते कृपया असा समज करून घेऊ नकोस, एवढ्या लांब तुझ्यासोबत मी काय रडायला आणि तुला नाराज करायला आलेय का ... ? जी स्वप्न आपण रंगवली आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या सदैव पाठी आहे फक्त एक गोष्ट आहे की मला पैसा, मोठं घर, दागदागिने नकोत. तुझ्या चेहऱ्यावर आनंद, आपण सोबत घालवलेले क्षण हे माझ्यासाठी जास्त अनमोल आहेत. मूलभूत गरजा भागवू शकतो यापलीकडे जास्त करण्याच्या धडपडीत जवळची माणसं दुरावत तर नाहीत ना याच भान ठेव. काम,घर,पैसा, नाती याचा विचार करुन वाग ,उप्स तुला काय पाठ ऐकवतेय , बघ असं होत असो हे सगळं असं आहे पण माझं तुझ्यावर प्रचंड , अत्यंत , अगणित, अथांग , अमर्याद प्रेम आहे.
बर नसेल तुला तर मी माझा त्रास विसरते, तुला बर वाटलं की निश्वास सोडते. मी तुला सर्वस्व मानलयं तू फक्त अर्धांगिनी मान आता. अशीच आहे मी जरा फटकळ, थोडी भावनिक. भावनांचा उद्रेक झाला कि नदी वाहू लागते सॉरी पण कितीही प्रयत्न केला तरी मी नाही अडवू शकत पण तुला या गोष्टीचा त्रास होतो म्हणून यापुढे हे कमी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
सर्वस्व तू आहेस म्हणजे तिथे माझ्या आवडी निवडी येत नाहीत परंतु तरीही तू जवळ घेऊन सांगतोस ना तुझ्या आवडी निवडी जप ; तेव्हा मनात हायसं वाटत आणि गहिवरून येत याआधी कोणी असं बोललेलं नाही ना म्हणून असेल कदाचित.
कधी स्वतःचा विचार करायला शिकवलं नाही मला कोणी. आधी समोरच्याला काय हवंय, त्याला काय वाटेल अश्या विचारांनंतर कृती करायची माहित आहे मला. मग इथे मी शून्य असते. असं होत ना वर्षानुवर्षाचं जे साठलंय ते मोकळं करायला हक्काच माणूस मिळाल्यावर तो सागर कधी ओढा बनून,कधी परा तर कधी नदी बनून वाहतो तुझ्यासमोर . निम्मित वेगळं असल तरी आधीचा दबाव कमी होतोय. मी हळूहळू मोकळी होतेय. तू माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजतंय . तू प्रत्येक गोष्ट माझी ऐकतो नाही म्हंटल कि बस आता नाही अशी ठाम भूमिका घेतोस. कधी माझा एकही शब्द खाली पडू देत नाहीस,कधी कधी उशीर करतोस पण विसरत नाहीस.तुला माझ्यासारखी प्रत्येक गोष्ट व्यक्त करायची सवय नाहीये पण कदाचित तू जे साठवतोयस मनात त्याचा तुला प्रचंड त्रास होतो आणि तो विक्षिप्त रागात बाहेर पडतो.हा एक आहे की तू प्रयत्न करतोयस व्यक्त होण्याचा एक दिवस तू हि मोकळा होशील पण काय आहे ना मला माहित आहे मी तुला संधीच देत नाही😝🙏🏼 माफ कर हा .
नात्याची कळी उमलू दे हळूहळू , त्यातच मजा आहे ,हे तुझे वाक्य अगदी खरे आहे. आपण एकमेकांना जस आहे तस स्वीकारलं आणि आता एकमेकांना हवंय तस बदलण्याचा प्रयत्न करतोय यातच कळतंय कि दोघांनाही या नात्याची किती गरज आहे.हॅहॅहे कितीही बोललं ना आपल्याबद्दल तरी ते कमीच पडतंय असो ....
क्रमश:
तू माझं सर्वस्व, मी तुझी अर्धांगिनी।।
- अन्वीता💞(आरु)
Comments
Post a Comment