Posts

प्रतिक्षा...

कळत होते नभास त्या लपली सूर्यकिरणे आता दाटलेला कंठ नभाचा विनवतोय त्यालाच आता बास झाली परीक्षा हि संपलाय धीर आता एक नभ विनवी दुसऱ्यास चल ना रे बरसुया आता कंटाळा मज आलाय भार झालाय जन्मांचा जल शिंपडून जन्म देऊ अन् संपवू भार जन्माचा दाटलेला कंठ विनवतोय दाटलेल्या कंठाला आता पाण्यासाठी तरसतोय एक एक व्यक्त होण्यासाठी आता संपली प्रतिक्षा आता ही घन निळा बरसला धरणी हि सुखावली सुगंधी संसार पुन्हा थाटला वेळ वेळीचे मूल्य सारे वेळ वेळीनेच भागले योग्य वेळेवर वाटेत मन अतृप्त शांत झाले  ।। -आरु💞

प्रीत हि वेडी

प्रीत हि वेडी प्रीत हि वेडी ओढ लागली शब्द दाटले अन् हि सांज जाहली साद घालती संथ वाहती प्रेम वारे हे कानी गुंजती रीत आगळी प्रीत वेगळी सूर छेडले आपल्या मनी दिन धावती बंध जोडती काच भंगते मने दूर जाती मी रे तुझी साथ तू दिली धन्य जाहले प्रीत लाभली हात हे हाती दूर जर जाती श्वास खुंटेल तत्व देह त्यागती ।।। -अन्विता

पाऊस

हे थेंब पावसाचे घेऊन आज आले मधुर गंध प्रीतीचे मन न्हाहून निघाले सर एक प्रेमाची पर्णपर्ण बहरले पंख पांघरून स्वप्नात मन निजले -आरु💞

का असे वाटते ...

का असे वाटते ... आज का असे वाटते एकटेच बसून राहावे जगाला विसरून जावे का असे वाटते फक्त एकांतच असावा सगळे अबोल असावे का असे वाटते की, मी अन् मीच असावे सर्व काही विसरून जावे कोण...

कथा

कथा कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ कुणा सांगू मी ।। रस्त्यावर काटे आहेत डोळ्यांमध्ये पाणी आहे सूर्याची किरणेही आज दूर कुठे हरवलेली आहेत ।।१।। आज एकही फुल का उमलत नाही? आज मन...

मुलगी

मुलगी गोड आवाजात बोलणारी पाणीदार डोळ्यांतून बघणारी मायेच्या रंगात रंगलेली सर्वांना समजून घेणारी ..... मुलगी विचार न करता मदत करणारी मायावी जगाला विसरणारी मनातून निष्प...

बाबा

बाबा कविता करतात आईवर का नाहीत त्या बाबांवर त्यांच्याच तर शिकवणींचा ठसा उमटतो जीवनावर क्षितिजाप्रमाणे त्यांच्या प्रेमाला अंत नसतो बाबा आणि आईत मग फरक काय असतो ? आई प्...