हाक

सुखदु:खाच्या वाटेवरती
हाक ऐकली कुठेतरी
शोधत साद अनोखी
भरकटत गेले कुठवरी

वाट सरेना मन थकेना
एक किरण शोधताना
ध्वनी तो हाकेचा
गुंजतोय कानी भरकटताना

दीव्याच्या प्रकाशाला
दीव्याखाली शोधतेय जशी
मरताना प्रत्येक श्वासाला
श्वासानेच जिंकतेय तशी .....

-आरु😇

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....