शब्द .....

शब्दांची माळ ओवताना गुंता वाढतोय जसा स्वर निरागस ऐकताना मधुनच भुंगा गुणगुणतोय ... सुत्र बदलत आहेत पण गणित सुटत नाही ... मुळी गणित हा आवडीचा विषय नाही तो भाग वेगळा ... 😢
पण उत्तर मिळेल ही आशा की फक्त आभास ..?
अरे काय आणि किती हा शब्दांचा खेळ... ?
वाक्याचा अर्थ साधा " , " -याची जागा बदलली की बदलतो ... आवाजातला चढ उतार बोलण्यातला रोष दर्शवतो पण आजकाल मेसेजेस मध्ये हा प्रकार कळुन येत नाही .. फोनवरच्या बोलण्यातुन हावभाव कळत नाहीत... गैरसमज , अविश्वास यांना थारा मिळायला सुरुवात होते ... अजब गजब ही दुनिया शब्दाची ... सगळ्या प्रश्नांची निशब्द होउन उत्तरे जरा लवकर मिळतात..  अथवा दुर्लक्ष करुन मन:शांती देतात ...

शब्द....

अजब जिवनाचे गाणे
विचित्र स्वरांचे तराणे .... 😇
खेळ शब्दांचे अनोखे
क्षण क्षण हसत क्षण क्षण रे रडणे ...

जवळिक वाढवी हे
दुरावाचेही कारण हेच,
मलम यांचेच मौल्यवान,
जखमेवर यांचीच ठेच

....... आरु 😇

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....