Posts

Showing posts from 2016

शोध

शोधू नको चालत जा वाट तुला सापडेल, पाट शोधू नको आता अश्रूंची नदी थांबेल। जीवनाला व्यापून घे तुझी जागा तुला मिळेल, एक धागा नात्याचा बांध, रेशमी बंध तुला साधेल। श्वासातलं मो...

आठव

आठव आसवांची की तुझ्या चारोळ्यांची, मनात फक्त भरली रे प्रीती तुझ्या शब्दांची ।। आठवणी जाग्या झाल्या उरात जागर पेटला, ठिणग्या आता टाकल्या तरी मांडव थाटला ।। साथ नाही तर न...

कळलंच नाही

काही तरी राहून गेलं काय ते कळलं नाही वेड मन बोलणार होत ते हि काही बोललं नाही अन् न बोलल्यानेच काहीतरी राहून गेलं ..... काय ते अखेर कळलंच नाही ।।।।

शब्द वेडे

शब्द वेडे , मन माझे , अक्षरांत गुंतलेले । मन खुळे, ध्यान माझे , क्षणाक्षणांत हरलेले । सुख मिळे, तन माझे, मनमुराद हसलेले । वेळ खुळी, भय माझे, समोर पुन्हा थाटलेले । विसर अश्रू,म्ह...

साद

साद... निशब्द तु निशब्द मी नात्यांना साद तरी प्राप्तला निर्बंध तु निर्बंध मी नजरेने बांध तरी घातला ..... वेळ अबोल जाहली स्वर अंतरंगात नादला तिमिराला गाठले अन् साकार सम गाठला .... - आरु💞

तू .......

मायेची छाया तू मनातील दिप तू तुझ्यावाचुन करमेना क्षण हे सलती तुझ्याविना .... मनातील प्रित तू निरागस हास्य तू मनमोगरा हा फुलेना क्षण हे सलती तुझ्याविना... पहिल्या पावसातील मातीता गंध तू वाट आता पाहवेना क्षण हे सलती तुझ्याविना... मन म्रुगाची माझ्या कस्तुरी आहेस तू शब्दातुन तुझ्या सावरेना क्षण हे सलती तुझ्याविना.... आरू

म्रुगजळ

जवळ जाता हरवते दुरुनी मात्र हसते जिव लागतो माझा मन हे सुंदर रमते ...|  प्रेमाचा ओलावा वाटे ममतेची छाया भासे काय आहे हे सर्व जावुन बघावे म्हणते...|  मिळविन्या ते हास्य रमविन्या मनास केली मी धावपळ उमगले मला ते होते फक्त सुखाचे म्रुगजळ .... ||| आरु

दुऑं

महकती ये खुशबू मौसम की हर अदा आपके नाम कर दुॅं रब से ये दुऑं मांग लु... हर मिठी मुस्कान खिलती हर एक कली बस आपके नाम कर दु आज ये दुऑं मांग लु.... हर खुशी मेरी हर सुख मेरा आपके ही नाम कर दु आज ये दुऑं मांग लु.... |||| आरु

मितभाषी ..

मितभाषी आणि स्मितभाषी असावे ... कारण नाती जुळतात आणि जपतात.. आपण आज काय केले यापेक्षा कोणाला काय बोललो यावर मन:शांती अवलंबून असते ... माणुस येतो आणि जातो , मागे उरतात फक्त त्याचे शब्द .. किती माणसं शब्दांनी जोडली आणि किती तोडली .... मितभाषी राहा ... स्मितभाषी राहा .. तसही एक जुन गाण मस्त संदेश देत ... "एक दिन बिक जाएगा माती के मोल, जग में रह जाएगे प्यारे तेरे बोल ....." अन्वीता 😊

कविता ....

कविता .... कविता फक्त अनुभवाच्या नसतात कविता अनुभवायच्या असतात... शब्दांना भावनेच्या धाग्यात गुंतवून एका एका संधीत गुंतवायच्या असतात.... दुरावलेल्या नात्यांना सांधायला अन् अबोल भाव वक्त करायला असतात .... कविता .... नवी नाती घट्ट करतात जुनी नव्याने जोडतात साथ सुरांची घेऊन प्रितीचे गाणे गातात ... कविता ....  -आरु

शब्द .....

शब्दांची माळ ओवताना गुंता वाढतोय जसा स्वर निरागस ऐकताना मधुनच भुंगा गुणगुणतोय ... सुत्र बदलत आहेत पण गणित सुटत नाही ... मुळी गणित हा आवडीचा विषय नाही तो भाग वेगळा ... 😢 पण उत्तर मिळेल ही आशा की फक्त आभास ..? अरे काय आणि किती हा शब्दांचा खेळ... ? वाक्याचा अर्थ साधा " , " -याची जागा बदलली की बदलतो ... आवाजातला चढ उतार बोलण्यातला रोष दर्शवतो पण आजकाल मेसेजेस मध्ये हा प्रकार कळुन येत नाही .. फोनवरच्या बोलण्यातुन हावभाव कळत नाहीत... गैरसमज , अविश्वास यांना थारा मिळायला सुरुवात होते ... अजब गजब ही दुनिया शब्दाची ... सगळ्या प्रश्नांची निशब्द होउन उत्तरे जरा लवकर मिळतात..  अथवा दुर्लक्ष करुन मन:शांती देतात ... शब्द.... अजब जिवनाचे गाणे विचित्र स्वरांचे तराणे .... 😇 खेळ शब्दांचे अनोखे क्षण क्षण हसत क्षण क्षण रे रडणे ... जवळिक वाढवी हे दुरावाचेही कारण हेच, मलम यांचेच मौल्यवान, जखमेवर यांचीच ठेच ....... आरु 😇

हाक

सुखदु:खाच्या वाटेवरती हाक ऐकली कुठेतरी शोधत साद अनोखी भरकटत गेले कुठवरी वाट सरेना मन थकेना एक किरण शोधताना ध्वनी तो हाकेचा गुंजतोय कानी भरकटताना दीव्याच्या प्रकाशाला दीव्याखाली शोधतेय जशी मरताना प्रत्येक श्वासाला श्वासानेच जिंकतेय तशी ..... -आरु😇

विचार

चालता बोलता दिवस सरत असतात... नवे जुने हेवे दावे कमी जास्त होत असताना अचानक काही अशी वळणे येतात की निर्णय घेण फक्त अवघड नाही अशक्य होत .... आभाळ कोसळ्यासारख ,काळोख दाटल्यासारख समोरच सगळ काही दिसेनासं होत . अश्या परीस्थितित दिवसासुध्दा रातआंधळेपणाची जाणीव सलते मनाला.. प्रित आंधळी जीत आंधळी जगण्याची ही  रीत आगळी ....

बोल

तुझ्या रंगात रंगले मी ... अशी का दुभंगले मी ... बोल हे तुझे की माझे ज्या बोलात गुंतले मी ... ! साथ क्षणाची मज लाभता त्या क्षणात खंगले मी आठवात रे तुझ्या आसवात गुंगले मी .... बोल हे तुझे की माझे ज्या बोलात गुंतले मी .... -आरु ...😇

पैज

पैज ही जगण्याची आहे मोठी कठीन जसे वाळुत चालताना काटा बोचतो पायात... स्वप्नांचे ओझे जपता हरवुन मी पन गेले ईतरांसाठी हसता हसणे माझे हरवुन गेले क्षणोक्षणी मरत असताना जगण्याचे नाटक नविन पैज ही जगण्याची आहे मोठी कठीन .... !! ... आरु ..😇

प्रीत तुझ्याच मनातली

कळे जे मला .. ते कळेना का तुला .. प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !! भाव बनले शब्द जे प्रीत तुझी तरी शब्द हे ... आठव तुझी सख्या ती सांजवेळी छळे मला ..... प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !! अव्यक्त तूझी प्रीत ही जगण्याची झाली रीत जी नयनांचे संवाद जेव्हा स्पष्टती सगळे मजला ... प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !! कळे जे मला .. ते कळेना का तुला .. प्रीत तुझ्याच मनातली उमगेना का तुला.. !! - आरु .. 😊