Posts

Showing posts from May, 2020

परिवर्तन

Image
बोलकं असण्याची माफी मागावी लागतेय  स्वभाव बदलण्याची सवय करावी लागतेय का प्रत्येकवेळी आपण माघार घ्यायची गरज फक्त मलाच आहे का या नात्यांची वाटत समजून घेणारा एक व्यक्ती आहे  त्यापुढे बोलण्याचा त्याला त्रास होत आहे  सगळं दाटलेलं आता साठवाव लागतेय स्वभाव बदलण्याची सवय करावी लागतेय मनात रडले तरी वरवर हसावं लागतेय  त्याच्या सोबतीसाठी सर्व हे झाकतेय त्यालातरी भावना कळतील आशा बाळगतयं मनातल्यामनात सार काही फक्त धुसमुसतंय एकांतात मोकळं व्हायला जागा शोधतंय बंदिस्त खोलीत मात्र खूप गुदमरतंय  मोकळीक फक्त विचारांची मिळतेय येतील त्या क्षणात जगायला बघतेय आता अबोल बनून जगायला शिकतेय मूळचा स्वभाव बदलायला निघतेय 🥺

शब्द बोलू लागले

पेन आला हाती  शब्द उमटू लागले भाव अंतरंगातले आज बोलू जाहले । गदारोळ त्यांचा होता बांध मी हो घातले गर्दी नको विषयांची तर भाव हे गोठले । व्यक्त होण्याची सारे वाट शोधत होते मुक्तीच्या आशेत आज स्वच्छंद बागडत होते । सारे अगदी दाटलेले  मत मांडत होते फरक  नसेल जरी कोणास , सांगत सारे होते । स्वच्छंद हवेत उडाले भार हलके झाले दखलपात्र नसले तरी कागदावरती आले । कागदाचा मात्र भार आज वाढला आहे वाचून हलके करेल आस ही त्यास आहे । भावनांचा भार हा  त्यासही पेलवला नाही भरकटला तो ही  त्यांसवे दिशा दाही ।। - आरु

सुखमेघ

सुखमेघ बरसले मन खुदकन हसले घन सावळा बरसला ऋण सारे फिटले ।। -आरु

सय ..

सय.. येता जाता, चालता बोलता, घर मनात  करून गेल्या .. भांडण, रुसवे,  फुगवे अन हसण्याने घर  सजवून गेल्या.. हसून निरोप  घेताना स्वतःच जलधारांत या  वाहून गेल्या.. ओळखा कोण  असतील या सप्तरंगात जग  सजवून गेल्या ? -आरु

अंकुर

काय घडले हसता खेळता नभ कोसळले क्षणात सारे मी तर आहे इथेच आजवर जीवनाचे मात्र बदलले वारे वाऱ्याच्या त्या वेगात आता पाकळ्यांनी धीर सोडला जरी एकवटल्या फांद्या तरी माझा आज कणा मोडला फळांनी आता धरली धरती मातीमोल हो काया झाली बोलता बोलता आज इथे ओळख माझी अपुरी राहिली अनेकदा ऐकले मी आहे संपते तिथे सुरुवात नवी बीज अंकुरत बोलत आहे तुझ्या मायेची साथ हवी -आरु

द्विधा ...

गरज असते का  मनात नसतानाही हसण्याची पटत नसतानाही होकाराची उत्तर नसतानाही ते देण्याची गरज असते का  बोलत नसतानाही बोलण्याची अश्रूंना डोळ्यात आटवायची जागा नसतानाही साठवायची गरज असते का हवे असतानाही नाकारायची बळ असतानाही खंगायची पंख नसतानाही उडायची गरज असतेही अन नसतेही मन तर कधी मान जपताना नको असले तरी नाती जपताना रोज स्वतःला धीर देताना -आरु

झेप..

झेप.. बोलता बोलता हसता गाता नियतीने चांगलाच खेळ मांडला स्वप्नांसह  माझ्या मनाचा कडेलोट का केला गेला ? नको नकोसे जीवन होता जगण्याचा अट्टहास धरला "जगावेच लागेल तुला!" अन अपेक्षांचा मारा केला ओझे सांभाळता त्यांचे आता वाटा साऱ्या बदलत गेल्या तो मी अन मी आताचा प्रतिमा साऱ्या धूसर झाल्या बदल खेळ नियतीचा असता मत परिवर्तन होत होते स्वतःचे कधीही न ऐकता जीवन मात्र अनोळखी होते मजसाठी जगण्याचा मी नवा आज अट्टहास धरला माझे मी आकाश शोधता पंखात नवा त्राण भरला  पहिली वहिली झेप घेतली स्पष्ट झाले आयुष्य मला एक नभी ज्योत पेटली  स्वत्व गवसले आज मला  -आरु

शेवटचे पान ..

शेवटचे पान .. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा माहिती मला सूर छान होय मीच आहे वहीचे शेवटचे पान .. टिंगल टवाळी  अन सुरेख नक्षी सगळ्यांचा हो मीच आहे साक्षी  प्रत्येकाचा आता ओळखतो मी भांग काय हवी माहिती  पटकन सांग .. मांडू शकतो मी छबी व्यक्तींची माहीत आहे मला खोडी प्रत्येकाची म्हणूनचं तर वेगळा असतो माझा मान होय मीच आहे वहीचे शेवटचे पान ..                   -आरु

करार..

करार ... आयुष्याचा करार मांडला हा बाजार साथ तुज असेल  नसेल माझी माघार .. रखरखत्या उन्हात  फुललेला गुलमोहर सुकलेल्या डोळ्यांना जशी सुखाची चादर.. सुखावल्या अंगणात वेली झालेल्या बेकार आता पर्याय शोधत स्वप्न होईल साकार  बघ नवीन प्रहरी सजेल नवा आकार आशेचा किरण असेल नको देऊस नकार ।। - आरु

आठवणी

वादळासारख्या आठवणी आल्या मोत्यांच्या धारा घेऊन टपोऱ्या डोळ्यातून बरसल्या मुसळधार पाऊस होऊन   मुसळधार पावसातला  एक थेंब माझा असू दे मनाच्या घरातला एक कोपरा माझा असू दे तुला यातून सावरताना जाईन मी वाहून जरी आठवणी आल्या  असा पाऊस घेऊन ... स्वप्नातल्या सप्तरंगाचा एक रंग माझा असू दे हृदयातील रोपांचा  नवपर्ण माझा असु दे  नवजीवन बहरेल  सर्वस्व झोकून देईन सांग फक्त मला ... सांग फक्त मला ... जर आठवणी आल्या वादळ होऊन...                 - आरु

चौकट ..

Image
चौकट.. चौकट चार भिंतींची चौकट चार नात्यांची बंदिस्त आयुष्यात चौकट भावनांची ।। चौकट चार सुरांची चौकट चार रागांची बंदिस्त आभाळात चौकट रंगांची ।। चौकट चार शब्दांची चौकट चार रसाची बंदिस्त मनास चौकट हास्याची ।। चौकट चार वेलींची चौकट चार धारांची बंदिस्त वेळेस चौकट क्षणांची ।। - आरु

देशील ना ?

देशील ना ?   दोन गोड शब्दांची  साथ मला देशील का ? मी आहे रे फक्त तुझी एक प्रेमळ हाक देशील का ? फुलणाऱ्या कळीवर बेधुंदशी  एक फुंकर घालशील का ? सुकलेल्या भूमीला थोडा  ओलावा देशील का ? उडताना या पतंगाला वाऱ्याची साथ देशील का ? वसंतातला बहर तू  या जीवनी आणशील ना ? बोल ना साथ मला  देशील ना ? देशील ना ?                         -आरू

विरह...

सुख समजायला जसं दुःखाचा डोंगर हवा । प्रेम फुलायला तसाच शून्यातील विरह हवा ।। वाटतो तुझ्यासवे जसा प्रत्येक क्षण नवा । प्रेम उमलायला तसाच त्यात रमलेला वेळ हवा ।। संथ पाण्याला जसा  खळखळणारा झरा हवा । प्रेमात डुंबताना तसाच  प्रीतीचा सागर हवा ।। अथांग नभात जसा  चांदणीला चंद्र हवा।  नवजीवन बहरायला तसाच  तुझ्या प्रेमाचा संग हवा ।।                         - आरु

जिंदा हैं क्यों हम ...?

Image
जिंदा हैं क्यों हम ...? जिंदा हैं क्यों हम , अब आँखे है क्यों नम । हसने ने फुरसत नहीं दी तो अब क्यों है गम ।। दूसरे तो पराये है ही अपने भी नहीं कम भाईबहन का रिश्ता भी अब  हो गया है गुम ।। जिंदा है क्यों हम , अब क्यों आँखे है नम ।।  दुःशासन के दरबार मैं  द्रौपदी संग कान्हा था अब पहचान छुपानेवाले थोड़ी ना हो गए है कम। जिंदा है क्यों हम, अब क्यो आँखे है नम । अपनों ने ही रिश्तों की देखो मिट्टी बना डाली बोलो अब क्या आप उठाओगे मेरी डोली ...? भरोसे की भीख मांग रहै है अब तो भिक डालो पोंछो ये आँखे जो सदियोंसे है नम .. जिंदा है क्यो हम ...अब क्यो आँखे है नम।। उड़ती पतंग की डोर  काटके मुस्कुराते जो तुम मुर्ज़ाई कली पे भी पैर रखके चलते हो तुम। जिंदा है क्यो हम . . अब क्यो आँखे ही नम।। - आरू

रिमझिम रिमझिम धारा ..

रिमझिम रिमझिम धारा धुंद-बेधुंद वारा मनास मोहवणारा निसर्गाचा खेळ सारा चाहूल लागता मनाला मन ओलेचिंब होते सप्तरंगात न्हाहुन  थेंबांच्या तालावर थिरकते हा ऋतूच आहे वेड लावणारा या रिमझिम रिमझिम धारा .. अतुल्य या निसर्गात मन अतृप्त राहते पण अत्यल्प वेळात नाते अतूट जुळते पानांशी खेळणारा अंधाधुंद वारा अन या रिमझिम रिमझिम धारा .. हे थेंब पावसाचे  रिमझिम झरणारे भाव मांडण्यास सारे शब्दही अपुरे भरकटता आला अंगावरी शहारा या रिमझिम रिमझिम धारा अन बंधुंद असा वारा ... ।।

विश्वासाची नाती ..

विश्वासाच्या नात्याची  या जगामध्ये माती  आधारासाठी दिलेली ती एक तुटकी काठी .. विश्वासाने मागितले तर जीवन अर्पित होतो याच नात्यांसाठी रोज जीव जाळीत होतो  मुलीच्या कर्तव्यात  ठेवली नव्हती त्रुटी विश्वासाच्या नात्याची या जगामध्ये माती भावाच्या इच्छेसाठी मन मारीत आलो आईच्या इच्छेसाठी  रोज रोज खंगलो आनंदासाठी यांच्या कोरी लेकीची पाटी विश्वासाच्या नात्याची या जगामध्ये माती अनेक ठिकाणी रोज दौप्रदी विनवत आहेत कुठे हरवलाय कृष्णा  तुलाच शोधत आहेत    यांनीच आता उचलावी हातामध्ये काठी विश्वासाच्या नात्याची या जगामध्ये माती ... आधारासाठी दिलेली ती  एक तुटकी काठी .. -आरु

तुझ्यामुळे ..

Image
तुझ्यामुळे ... क्षण माझे हसले, मन माझे रमले रे  हसता हसता डोळ्यांनी  मोती टिपले तुझ्यामुळे ... कळी उमलताना रंग बहरलेले रे  बोलता बोलता श्वासांना सुगंध मिळाला तुझ्यामुळे ... पंख मिळताना  जग बदलेले रे  उडता उडता पाखराने जग जिंकले तुझ्यामुळे ... - आरु

क्षण

Image

रेशीम ..

रेशीमबंध नात्याचे विणता गरज बनते एक धागा तूटता  सुरुवात नव्याने होते ...  धीर सुद्धा सुटतो कधी धागा मुकता कधीतरी नवा गुरफटतो हळूच कधी न कळता रेशमात ल्यालेले हे वस्त्र सुंदर दिसते  यासाठीची धडपड लपून गालात हसते  रेशीमगाठी जुळताना  मने एक होतात साथी एकमेकांच्या सुरेल गाणे गातात रेशमाचे प्रतीक हे अनमोल अन अनोखे अश्याच एका बंधात  साथ देशील का ग सखे ???  -आरु

चांदणे ..

चांदणे ... हलक्या हलक्या चांदण्यात तुझे हास्य दिसले लाजताना मी मनात प्रेमात आज पडले पडता पडता सागरात तूच तोल सावरला हाती हात घेता तू जीव माझा बावरला बुडता बुडता विचारात टिपूर चांदणे झाले या बहरणाऱ्या नात्यात  मी संपूर्ण न्हाले  रमताना या तरण्यात  मग मला उमगले सखे गं.. आहेस स्वप्नात मग हळुवार डोळे उघडले ...

आई....

आई.... शब्दांची गरज नाही तिला भाव डोळ्यातले ओळखते ती आवाजातला ओलावा कळतो तिला आई... तुझी रोज आठवण येते मला ।। मन भरकटते दाही दिशांना जीव धडपडतो शोधताना माया  पापण्या मिटतानाही सलते ओढ  कुठेही मिळत नाही ती सुखद छाया   हे न सांगता ही कळते तिला  ... आई ... रोज आठवण येते मला संकटात धीर सुटत नाही माझा असतो एक किरण उमेदीचा साथी अश्रूंच्या धारा अटतात डोळी माझ्या हास्य उमलते हळूच माझ्या ओठी  शिकवणींवर विश्वास आहे ना हो तिला ... आई... रोज आठवण येते मला  ना बोलता ही सल तिला उमगून जाते लपवलेले सगळे कसे तिला कळून येते कोणी नसले तरी ती असेल पाठी हे जगात अनमोल असे एकमेव नाते हे खरं तर सांगायची गरजच नाही तिला ... न बोलता ही कळते तिला ... तिची रोज आठवण येते मला...

लम्हे...

चुराये थे कुछ लम्हे रेत से बह गये प्यार के वादे आसूओमे मे रह गये ।। कुछ लब्ज ऐसे थे वो दिल मे बैठे थे पर वक्त के धारा मे बस जख्म दे गये ।।1।। प्यार के वादे  आसुओंमे रह गये चुराये थे वो लम्हे  सुखी रेत मे बह गये ।। क्या था वो  बस मेरा प्यार था क्या हुआ वो जो तेरा एकरार था  वो लम्हे गुम हो गये जब साथ तेरे हम थम गये क्यू वो वादे  आसुओमे बह गये  चुराये हुये वो लमहें  जो थे बस हमारे ना तुम रहे ना हम रहे वो जो राही थे पुराने बिना तेरे सहारे कापते हापते ... हम आज बढ गये प्यार के वादे आसूओमे मे रह गये ।।

खेळ शब्दांचा ...

Image

आज नव्याने.....

आज नव्याने..... स्वच्छंदी मनाने , खेळ मांडला पत्त्यांचा बंगला हलकेच कोसळला. उभारलेले नवे , घर आपुलकीचे हवे मनोमने जुळलेली , हास्यात भिजलेली... पण आज नव्याने ... गर्वाच्या भुताने खेळ मांडला पत्त्यांचा बंगला हलकेच कोसळला ... वाटले की कोणी .. वाटले की कोणी दुखावले नाही .. पैश्याचा पसारा कधी सर्व घेऊन गेला ... अरे कळलेच नाही.. कधी खेळ हा संपला.. पत्त्यांचा बंगला हलकेच कोसळला .. धीर धरत मनाने ,, ठरवले नव्याने .. प्रेम आणि जिव्हाळ्याच्या भिंती उभारून नव्या .. पुन्हा जमतील सारे , आवाज दुमदुमेल हसलेला.. पुन्हा बांधेल बंगला तो हलकेच कोसळलेला.... पुन्हा नव्याने उभारला ... ! -आरु ❤

माळ शब्दांची ....

Image